Started 2 years ago

देशातील खराब रस्ते व रस्त्यांवरील मोठी खड्डे यांबाबत संबधित ठेकेदार व इंजिनियर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत

User Image Vikasrao Kavde

13 Supporters

87 More Supporters Needed To Complete 100.
13%

देशातील खराब रस्ते व रस्त्यांवरील मोठी खड्डे यांबाबत संबधित ठेकेदार व इंजिनियर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत


अनेकांच्या मृत्यूस कारण म्हणून वरिष्ठ अधिकार्यांनी मनुष्य वधाचा फौजदारी गुन्हा दाखल करून कोर्टाकडून जबर शिक्षा व दंड व्हावा असा नवीन कायदा करावा.


सध्या राज्यात व देशात पाउस पडत आहे त्या पाउसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या व झाडे रस्त्यावर पडले आहे या नैसर्गिक आपत्तीला काहीच उपाय नाही. जे आरडा ओरड करतात तेच चुकीची कामे करतात, निकृष्ठ दर्जाचे काम करणारे ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर मनुष्य वधाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा असे वाटते ते योग्य असल्यास शासनाने त्वरित गुटखा बंदी प्रमाणे कायदा अमलात आणावा म्हणजे या पुढे रस्त्यावर पाउसामुळे खड्डे पडणार नाही. पाउसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडून त्यात अनेकांचे प्राण गेले, जीवित हानी व वित्त हानी जनतेची नव्हे देशाची होत आहे, याला जबाबदार कोण ? हि चर्चा करून पुढार्यांनी व कर्मचार्यानी एकमेकांवर चीडन्यापेक्षा पक्षा-पक्षा मध्ये टीका टिपणी करण्या पेक्षा , तुझी माझी करण्या पेक्षा, एकमेकांचे उणे – दुने काढून इतरांची ब्यांड-बाजा प्रमाणे भुंकण्यापेक्षा प्रत्येकाने शिस्तीचे व नियमांचे पालन केले तर देशहित व जनाहीतांचे कामे चांगले होतील. तूतू - मेमे करून स्वतः व स्वतःच्या पक्षाचा तोरा मिरवण्यापेक्षा परमेश्वराला आई – वडिलांना आपले कुटुंबाचे स्मरण करून जर कामे केली तर रस्ते चांगले राहतील, इमारती चांगल्या राहतील म्हणून शपथेवर शासनाने व पदादिकारी यांनी कोणत्याही कामाचा ठेका द्यावा, गायब माणसाचा ठेका मंजूर करावा, नालायक ठेकेदारांना ठेके देऊ नये, काळ्या यादीतील ठेकेदारांना तर मुळीच देऊ नये कारण काळ्या यादीतील ठेकेदार काही दिवसातच पांढर्या यादीतून येऊन तेच भ्रष्टाचारी मार्गाने ठेके मिळवतात व जनतेच्या जीवितास कारणीभूत ठरून देशाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करतात. अशा नालायक ठेकेदारांना ठेका देऊ नये. सिमेंटचे रस्ते बनवावे म्हणजे खर्च एकदाच होईल पण तो कायम स्वरूपी होईल.


लोकाप्र्तीनिधिनी एखाद्या ठेकेदाराला काम द्या असे सांगितले तरीही ठेकेदारानेच काम  उत्कृष्ठ केले पाहिजे त्या कामाचा दर्जा पाहण्याचे काम संबंधित इंजिनियर व कर्मचारी यांचे असते. त्यांच्या मंजुरी नंतरच ठेकेदाराला बिल दिले जाते.


ठेकेदार व इंजिनीर हे संगनमत करून निकृष्ठ दर्जाचे काम कसे होईल व तेच काम वारंवार करण्याची संधी कशी मिळेल याचा विचार करून जनतेला त्रास होईल, जनतेचे सांधे कसे दुखतील, जनतेमधील काही लोकांचा मृत्यू कसा होईल अशा प्रकारचे काम करतात. या कामांमध्ये ठेकेदार व संबंधित इंजिनीर व कर्मचारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा वरिष्ठ अधिकार्याने कोणाचीहि परवानगी न घेता दाखल करावा. चांगले कामे करणाऱ्या ठेकेदारांना या पुढे कामे द्यावी. यांच्या कामात आड येणाऱ्या कर्मचार्यांना व पुढार्यांना शासनाने किवा जनतेने तेथेच आडवे करावे असे वाटते.  

Vikasrao Kavde started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top