Started 2 years ago

वालिव - गोखीवरे ट्राफिक शी आम्ही वसईकर संतापलो येथे त्वरीत सहापदरी रस्ता केला पाहिजे

User Image Santosh India

58 Supporters

42 More Supporters Needed To Complete 100.
58%

वालिव - गोखीवरे ट्राफिक शी आम्ही वसईकर संतापलो येथे त्वरीत चौपदरी रस्त्या एवजी सहापदरी रस्ता केला पाहिजे,आता आपण दुपदरी रस्त्यांपैकी एकपदरी रस्ता वापरतो हा तर रिक्षा, दुचाकी आणिअनाधिकृत पार्किंग साठी वापरला जातो त्यामुळे २४ तासांपैकी १२ तास वाहतूक ठप्प असते 

अर्धा ते दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल वाया जाने, वेळेचे नुकसान, आणि मानसिक त्रास हा तर होतोच पण आजूबाजूच्या घरानाही प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. 

महामार्गावरून जाताना सर्वात आधी नवजीवन नाक्यावर फसा आणि वालीव वर येऊन अर्धा ते एक तास वाहतुकीत ताटकळत बसा त्यानंतर रेंज ऑफिस वर येऊन मचमच करा तेथून निघाल्यानंतर सरळ गोखीवराला अर्धा ते एक तास अडकून बसावे लागते त्यानंतर एवरशाइनला येऊन आरडा ओरड करा आणि तेथून सरळ क्रास  वर पूर्वेला महामार्ग ओलांडताना दहा मिनिटे थांबावे लागते सरळ खाली आल्यानंतर अंबाडी पंचवटी वर वीस मिनिटे वाया घालवावे लागतात आणि अंबाडी पोलीस चौकीवर पंधरा मिनिटे सहन न होणाऱ्या वाहतुकीशी संघर्ष करा आणि पार्वती क्रास  वर सर्वांशी डोक लावा जाता जाता माणिकपूर युनेयान बँक पासुन मारुती मंदिर पर्यंत गप बसून सर्वाना कोसा 

या सर्व रस्त्यांना सहापदरी करा जेणेकरून वाहतुकीचे सर्व प्रश्न सुटतील. आम्ही सर्व वसई नागरिक आमच्या हस्ताक्षर अभियाना सहित आमच्या नेत्यासोबत आहोत. आमच्या आमदार / खासदार यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी करावी त्यांना वसई पूर्व, पश्चिम, गाव आणि नालासोपारा येथील नागरिकांचा पाठिंबा मिळेल नाहीतर मतदाता संतापाने पेटून उठेल.
 

Santosh started this petition with only 0 Supporter.
Now recieving support and feedback from peoples.
You can also start a petition.

Petition Updates

No Updates Posted Yet.

0 Comments

Top